मा. आम. राजेंद्रअण्णा देशमुख यांचा घणाघाती आरोप……

राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी सांगलीत दाखल होताच भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. भाजपाचे खानापूर-आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत तुतारी हातात घेतली आहे. भाजपाने आम्हाला शिवसेनेला विकल्याचा घणाघाती आरोप करत भाजपा सोडल्याचं स्पष्ट केलं.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आपण जाहीर प्रवेश केल्याचं शरद पवारांच्या भेटीनंतर राजेंद्रअण्णा देशमुख यांनी स्पष्ट केले आहे,भाजपाने आम्हाला शिवसेनेला विकल्याचा घणाघाती आरोप राजेंद्र अण्णा देशमुख यांनी केला आहे, त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून आपण इच्छुक असल्याचे देखील राजेंद्र अण्णा देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.