प्रसिद्ध कापड व्यापारी अमित मधुसूधन भुतडा (वय ३२) यांचा रामेश्वर येथे हृदयविकाराने मृत्यू झाला.(rameshwar) भुतडा हे कुटुंबीयासमवेत चार दिवसापूर्वी रामेश्वर देव दर्शनासाठी गेले होते. समुद्रामध्ये स्नान करुन बाहेर आलेअसता त्यांना अस्वस्थ वाटू लागले. नातेवाईकांनी त्यांना तेथील स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल केले.
उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार दि.१८ रोजी सकाळी ११ च्या दरम्यान घडली.(rameshwar) विशेष रुग्णवाहिने त्यांचा मृत्यूदेह शनिवारी सायंकाळी इचलकरंजी येथे आणण्यात आला. येथील पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी शहरातील उद्योजक, व्यापारी, राजस्थानी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धामिर्क विधीनुसार त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.
ते अतिशय मनमिळावू होते, धामिर्क परंपरा जपणारा त्यांचा ओढा होता. यापूर्वी त्यांनी अशा तिर्थ यात्रा केलेल्या आहेत. त्यांच्या आकस्मात मृत्यूने राजस्थानी समाजात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ-भावजय असा परिवार आहे. उठावणी कार्यक्रम रविवार दु.४ वा. आहे.
City Varta:-
