अंबपवाडी मनपाडळे ते राष्ट्रीय महामार्ग क्र.०४ हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत बांधलं आहे परंतु या रस्त्याची स्थिती सध्या अतिशय दयनीय व बिकट अशी झालेली आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी उपअभियंता नितीन कांबळे यांना देण्यात आले.
अंबपवाडी लगत असणारे औद्योगिक क्षेत्र तसेच मनपाडळे येथील श्रीसमर्थ रामदास स्थापित अकरा मारुती मंदिर पैकी एक मारुती मंदिर आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच भाविकांची खूप गर्दी असते. त्यामुळे तात्काळ या रस्त्याचे डांबरीकरण करून रस्ता दुरुस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला. निवेदनावर बोलताना, कार्यकारी उपअभियंता नितीन कांबळे यांनी येत्या पंधरा दिवसांमध्ये रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित शिवसैनिकांना दिली.
