गेली वर्षभरापासून सागर पुजारी हिव्वरखान मंदिराज ब वर्ग दर्जा मिळावा यासाठी या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. तत्कालीन मंत्री अदिती तटकरे यांना निवेदन देऊन मागणी ही केली होती. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. याचा सागर पुजारी यांनी पाठपुरावा केला आणि हिव्वरखान मंदिरास ब वर्ग दर्जा मिळालेला आहे.
हिव्वरखान मंदिरास ब वर्ग दर्जा दिल्याबद्दल मंत्री महाजन यांचा लोकरीचे घोंगडे, काठी देऊन पुजारी, गोरे यांनी आभार मानले. त्यानंतर तात्काळ निधी मिळावा यासाठी पुजारी यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली.
समस्त धनगर समाजाचे आराध्य दैवत कुंभोज येथील हिव्वरखान मंदिरास आता ब वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा दिलेला आहे. सागर काळजी करू नकोस पर्यटन मंत्री म्हणून मी या मंदिर परिसराच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी देणार आहे तसे आदेश माझ्या मंत्रालयाला दिले आहेत अशी ग्वाही पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली आहे.
चार दिवसापूर्वी हिव्वरखान मंदिरास ब वर्ग दर्जा दिल्याचे पत्र मंत्री महाजन यांनी सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी दादा गोरे यांच्याकडे मंत्रालयात सुपूर्द केले आणि यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले आहे.