खानापुरातील एका 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या नराधमाला वीस वर्षांचा कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा बेळगाव पोक्सो न्यायालयाने शुक्रवारी सुनावली. शाहू रामा गावडे असे त्याचे नाव आहे. घटनेनंतर दीड वर्षाच्या आत न्यायालयाने निकाल दिला आहे. याबाबत खानापूर पोलिसांनी तपास करून पुरावे व आरोपीला न्यायालयासमोर हजर केले होते. 13 वर्षांची पीडित मुलगी तिच्या आजीसोबत राहत होती. तिला नीट बोलता येत नव्हते. आरोपी शाहू गावडे 16/09/2023 रोजी पीडितेच्या घरी कुणीही नसताना पीडितेच्या घरी गेला.
लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशानेे तिचे तोंड दाबून तिला घरामागील जंगलात नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत खानापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले. तपास पूर्ण झाल्यानंतर 01/12/2023 रोजी आरोपपत्र तयार करुन पोक्सो न्यायालयात सादर करण्यात आले. या खटल्याच्या सुनावणीत त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले. शुक्रवारी न्या. सी. एम. पुष्पलता यांनी आरोपीला 20 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 हजार रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली