CSIR Recruitment 2025: १२ वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; महिन्याला ८१ हजार पगार; कसा करायचा अर्ज? वाचा

बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची एक खास संधी आहे. केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेअंतर्गत भरतीसाठी एक अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत २०९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत, ज्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवार २१ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात, पण अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पदासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, पगार, वयोमर्यादा आणि इतर सर्व अटीशर्तींची तपशीलवार माहिती घ्यावी.

रिक्त पदांची संख्या – २०९

पदाचे नाव

  • ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट – १७७ पदं
  • ज्युनियर स्टेनोग्राफर – ३२ पदं

शैक्षणिक पात्रता

उमेदवार १२ वी उत्तीर्ण असण्याबरोबर त्याला इंग्रजी, हिंदी, मराठी टायपिंग येणं गरजेचं आहे.

वयाची अट

उमेदवाराचे वय २१ एप्रिल २०२५ पर्यंत १८ ते २८ या दरम्यान असावे. यात एससी आणि एसटी उमेदवारांना ५ वर्ष तर ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांची सूट आहे.

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क

  • जनरल, ओबीसी आणि इडब्ल्यूएस – ५०० रुपये
  • SC/ST/PWD/ExSM – फी नाही

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ एप्रिल २०२५
  • परीक्षा – मे/ जून २०२५ दरम्यान

पगार

निवडलेल्या उमेदवारांना पदानुसार १९००० ते ८११०० रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळेल.

अर्ज कसा करायचा?

  • सर्वप्रथम crridom.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • Recruitment Section वर क्लिक करा आणि संबंधित सूचना निवडा.
  • नोंदणी करा आणि आवश्यक तपशिलांसह अर्ज भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज शुल्क भरा.
  • अंतिम मुदतीपूर्वी फॉर्म सबमिट करा आणि संदर्भासाठी एक प्रत डाउनलोड करा.