आष्टा येथील रायगड पतसंस्थेची मार्चअखेर झाली १०० टक्के कर्जवसुली 

आष्टा येथील रायगड नागरी सहकारी पतसंस्थेची ३१ मार्चअखेर १०० टक्के कर्ज वसुली झाली आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी सूर्यवंशी यांनी दिली. संभाजी सूर्यवंशी म्हणाले, आष्टा शहरातील गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी रायगड पतसंस्थेची स्थापना झाली.पारदर्शक कारभारामुळे संस्था सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्या विश्वासास पात्र ठरली आहे.

यावेळी उपाध्यक्ष सारिका इटकरकर, तुषार सूर्यवंशी, अप्पासाहेब नायकवडी, जयकुमार रुकडे, संजय इटकरकर, शिवाजी डांगे, ऑडिटर राजेंद्र पाटोळे, लालासाहेब ढोले, सदानंद तोडकर, किसन कदम, रण गायकवाड, अक्षय चव्हाण, अजय शिंदे, प्रशांत कुत्ते, मीना कुलकर्णी उपस्थित होते.