डांगे कॉलेजच्या विद्यार्थ्यास ३३ लाखांचे वार्षिक पॅकेज

आष्टा, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय, आष्टा येथील कुशल मनोहर हराले या विद्यार्थ्याची एग्रो कॉर्पोरेशन लिमिटेड या आंतरराष्ट्रीय कंपनीत पर्चेस इंजिनीअर पदासाठीनिवड झाली असून त्याला एस. जी. डी. ३६,००० वार्षिक (अंदाजे ३३ लाख रुपये) एवढे पॅकेज देण्यात आले आहे. एग्रो कॉर्पोरेशन ही जगभरातील एक नामवंत कंपनी आहे. अॅड. राजेंद्र डांगे म्हणाले, विद्यार्थ्याने मिळवलेले हे यश केवळ त्याच्या हार्ड वर्कबरोबरच कॉलेजच्या क्वॉलिटी ट्रेनिंगचे फलित आहे. इंटरनॅशनल कंपनीत मिळालेले हि पोझिशन संपूर्ण संस्थेसाठी प्राइडफुल आहे. विश्वनाथ डांगे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थी ग्लोबल लेव्हलवर पोहोचत आहेत, हे आमच्या एज्युकेशनल सिस्टीमच्या प्रोग्रेसचे प्रतीक आहे. हे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही एक आयडियल ठरेल. या यशामध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रा. आर. ए. कनाई, डायरेक्टर डॉ. एल. वाय. वाघमोडे, रजिस्ट्रार डॉ. एस. एस. मोहिते, प्रो. संदीप मगदूम, डॉ. एम. एम. जाधव, सहाय्यक टी.पी.ओ. श्रीकांत पाटोळे, आणि त्यांच्या प्लेसमेंट टीमचे प्रभावी गाईडन्स आणि प्लॅनिंग यांचे मोलाचे योगदान आहे.