इस्लामपूरला जैन क्रिकेट स्पर्धेत गांधी चौक रॉकस्टार विजेते

इस्लामूपर शहरात जैन क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेत चेतन रायगांधी यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौक रॉकस्टार संघाने विजेतेपद पटकावले. स्पर्धा प्रकाशझोतात झाली. माजी नगरसेवक अमित ओसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत एकूण १० संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामना ईश्वरपूर रायडर्स विरुद्ध गांधी चौक रॉकस्टार यांच्यात रंगला. अटीतटीच्या लढतीत चेतन रायगांधी यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौक रॉकस्टार संघाने विजेतेपद पटकावले.

माजी नगरसेवक अमित ओसवाल यांच्या नेतृत्वाखाली आणि निखिल पोरवाल, रूचित पोरवाल, जुगल पोरवाल, राहुल पोरवाल, पद्मेश गांधी, निखिल पोरवाल आणि यशवंत माळी यांनी आयोजन केले. यावेळी प्रकाश पोरवाल, राजू पोरवाल, संजय ओसवाल, कमलेश शहा, दिलीप रायगांधी, निलेश शहा उपस्थित होते.