विधानसभेमध्ये प्रथमच विजयानंतर दोन साडू येणार एकत्र

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची कधी साथ कधी विरोध यास तोंड देत तीन अपयश पचवत अखेर त्यांचे साडू सत्यजित देशमुख यांनी विजय मिळवत आमदारकी मिळवली. यामुळे हे दोन साडू साडू आता विधानसभेत पोहोचले आहेत. माजी आमदार दिवंगत मोहनराव शिंदे-म्हैसाळकर यांच्या दोन कन्यांपैकी शैलजा या जयंतराव यांच्या तर रेणुकादेवी या सत्यजित यांच्या पत्नी आहेत. १९९५ मध्ये राजकीय घडामोडी घडल्या, यामध्ये नेते दिवंगत शिवाजीराव देशमुख हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांना उमेदवारी न देता शंकरराव चरापले यांना उमेदवारी दिली. यामुळे आणि देशमुख यांच्याकडे असणारी १९७८ पासूनची आमदारकी नाईक घरात गेली. १९९९ मध्ये सत्यजित यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. मात्र त्यावेळी अपयश आले. 

२००४ ला अपक्ष व २०१४ ला काँग्रेस उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. या तीनही निवडणुकीत अपयश आले. यानंतर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. सत्यजित यांनी भाजप प्रवेश केला आणि शिवाजीराव देशमुख व शिवाजीराव नाईक गट एकत्र आले. या मतदारसंघातील काँग्रेस जवळजवळहद्दपार झाली.

२०१९ मध्ये सत्यजित यांनी भाजपला साथ दिली. मात्र यावेळी शिवाजीराव नाईक यांना अपयश आले. दोनवेळा वसंतराव नाईक म्हणजे नाईक घराण्याकडे असणारी आमदारकी १९७८ पासून १९९५ पर्यंत देशमुख त्यानंतर १९९५ पासून २०२४ पर्यंत नाईक घराण्याकडे आमदारकी राहिली. यावेळी पुन्हा देशमुख घराण्याकडे ही आमदारकी आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंतराव, तर भाजपचे सत्यजित हे साडू साडू विधानसभेत पोहोचले आहेत.