इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा करणेत येत असलेल्या कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या मजरेवाडीकडून येणाऱ्या जुन्या पाण्याच्या नलिकेस गुरुवारी शिरढोण गावानजिक श्री. लोंढे यांचे घराजवळ गळती लागली आहे. यामुळे पाणी उपसा बंद करण्यात आल्याने शहरास होत असलेला पाणी पुरवठा दुपारी २ ने वाजले पासून तातडीने बंद करणेत आला आहे. या ठिकाणची गळती काढणेचे काम महानगरपालिकेच्या वतीने तातडीने हाती घेण्यात आले आहे.
यामुळे शहराचा पाणी पुरवठा खंडीत होणार असल्याने शहरवासीयांना अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळयात असे झाल्यात नागरिकांचे हाल होत आहेत. या पाइपलाईनची गळती काढणेचे काम पुर्ण होताच शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत करणेत येईल. तेव्हा शहरातील नागरिकांनी आपल्या जवळचा उपलब्ध पाणीसाठा जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचेकडून करणेत येत आहे.
