मुंबई: बॉलिवूड अभिनेता यापेक्षा महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा अशी रितेश देशमुखची ओळख त्याच्या चाहत्यांसाठी जास्त जवळची आहे. दिवंगत विलासराव देशमुख यांचा तो मुलगा. विलासराव यांच्या निधनानंतर देशमुख कुटुंबाचा आधार झाले त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख. दिलीपराव देशमुख यांनी विलासरावांच्या मुलांना वडिलांची कमतरता भासू दिली नाही. त्यामुळं या सगळ्या मुलांच्या मनातही दिलीपरावांबद्दल एक वेगळी आपुलकीची भावना आहे. आता त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्तानं रितेश देशमुखनं एक खास पोस्ट शेअर केली आहे.
रितेश देशमुखची काकांसाठी खास पोस्ट
प्रिय काका ७५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! तुमच्या मार्गदर्शनासाठी, प्रेमासाठी आणि अढळ पाठिंब्यासाठी आम्ही नेहमीच आभारी आहोत. तुम्ही आमच्या सर्वांसाठी शक्तीचा आधारस्तंभ आहात . तुम्ही आमच्या आयुष्यात आहात, हे आमचं भाग्य.
तुम्हाला चांगलं आरोग्य, आनंद आणि दीर्घ, परिपूर्ण आयुष्य मिळो हीच शुभेच्छा.आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. असं रितेशनं म्हटलं आहे.
भर सभेत रडला होता रितेश
दरम्यान, गेल्या वर्षी लातूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात रितेश देशमुख भाषण करताना भावुक झाला होता. वडिलांच्या आठवणींना उजाळा देत असताना त्यानं दिलीपराव देशमुख यांच्याबद्दलही भावना व्यक्त केल्या होत्या.
