वाळवा तालुक्यातील कारंदवाडी येथील आप्पा पाटील प्रेमी |ग्रुपच्या वतीने सोमवार ता. २८ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता विना काठी, विना लाठी भव्य जनरल अ गट ब गट, दुस्सा चौसा, आदत गट बैलगाडी शर्यतीचे (Bullock cart race) आयोजन करण्यात आले आहे. चार गटासाठी सुमारे सव्वादोन लाख रुपयांची बक्षीसे आहेत, अशी माहिती सरपंच हिम्मत पाटील, किरण पाटील, सागर सिद्ध, चैतन्य ढोले यांनी दिली. महालक्ष्मी यात्रेनिमित्त कारंदवाडी येथील आप्पा पाटील प्रेमी ग्रुपच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जनरल बैलगाडी अ गटासाठी प्रथम क्रमांकास ६१ हजार, द्वितीय क्रमांकास ४११११ रुपये, तृतीय क्रमांकास २११११ रुपये बक्षिसे आहेत. ब गटातील विजेत्यांसाठी प्रथम क्रं २१ हजार १११, द्वितीय १५१११ रुपये, तृतीय १११११ रुपयांची तर दुसा व चौसा गटासाठी पंधरा हजार, सात हजार रुपयांची तीन हजार रुपयांची तर आदत गटासाठी ७१११, द्वितीय क्रं ५१११रुपये, तृतीय क्रं. ३१११ रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
आष्ट्यात आज बैलगाडी शर्यतीचे आयोजन
