येथील सोमाजी ढोले मागासवर्गीय नागरी सह. पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात झाली. चालू आर्थिक वर्षात संस्थेला नऊ लाख नफा झाला असून सभासदांना आकरा टक्के इतका लाभांश देणार आहोत, अशी घोषणा संस्थापक चेअरमन रामचंद्र सिद्ध यांनी केली.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन दिलीपराव वग्यानी, आष्टा पीपल्स बँकेचे चेअरमन बबन थोटे, तानाजीराव सूर्यवंशी, विराज शिंदे,कौशिक वग्यानी, मोहन गायकवाड,ॲड.अभिजीत वग्यानी, पै.पांडुरंग ढोले हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी बाबासो सिद्ध यांनी स्वागत केले. रामचंद्र सिद्ध म्हणाले, संस्थेचे वसूल भागभांडवल तीस लाख आहे. गुंतवणूक दोन कोटी इतकी आहे. ऑडिट वर्ग ‘अ’ आहे. नफा नऊ लाख रुपये इतका झाला आहे. संस्थेच्या ठेवी चार कोटीच्या दरम्यान असून दोन कोटीच्या दरम्यान कर्जपुरवठा केला आहे. व्हा. चेअरमन आनंदराव ढोले यांनी व्हा.चेअरमन आनंदराव ढोले यांनी श्रद्धांजली ठराव वाचन केले. सचिव भगवान ढोले यांनी विषय वाचन केले. सर्व विषयांना एकमताने मंजुरी मिळाली. यावेळी कृष्णा माने, शिवाजी ढोले, दीपक मेथे, संपत ढोले, प्रथमेश झांबरे, पै. पोपट शेळके, लक्ष्मण ढोले, अनिल गावडे, भीमराव मस्के, अनिल सिद्ध, सयाजी गावडे, सुनील भानुसे, रियाज चौगुले, अरविंद मस्के यांच्यासह सभासद उपस्थित होते.
