वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत युवावर्गासह अबालवृध्दांनी मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली. सप्तरंगांची उधळण, युवा वर्गाचा ओसंडून वाहणारा जल्लोष, संस्कृतीचे जतन अशी परिपूर्ण रंगपंचमी इचलकरंजी शहर व परिसरात मोठ्या उत्साहात साजरी झाली. बुधवारी सकाळपासून चिमुकल्यांसह युवकांनी विविध रंगांची उधळण करण्यास सुरुवात केली. लहानांपासून वृध्दांपर्यंत-सर्वांनीच रंगपंचमीचा आनंद लुटला. काही ठिकाणी पारंपरिक वाद्यांच्या तालावर कोरडे आणि आरोग्यास हानिकारक नसणाऱ्या रंगांच्या सहाय्याने रंगपंचमीचा पारंपरिक आनंद लुटण्यात आला.
कोरड्या रंगाचा वापर मोठ्या 5 प्रमाणात केला गेल्याने रस्तोरस्ती विविध रंगाचे जणू प्रदर्शन मांडले गेले होते. रस्तेही तरुणाईप्रमाणे विविध रंगात न्हाऊन गेले होते. महिलाही रंगपंचमीचा आनंद लुटण्यास सरसावल्या होत्या. महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी दुचाकीवरुन जाऊन मित्र-मैत्रिणींना रंगवत होते. अंग भाजून काढणारे कडक उन्ह असले तरी त्याची कोणतीही तमा न बाळगता बेभान होते. त्यानंतर अनेक उत्साही युवक होऊन युवावर्ग रंगात न्हाऊन निघत होती. आंघोळीसाठी पंचगंगा घाटावर गर्दी केल्याचे युवक-युवती मोटरसायकलीवरुन शहरातील दिसून येत होते.
मुख्य मार्गांवरुन रंगाची उधळण करीत रॅली काढत होते. एकमेकांना रंगविल्यानंतर ग्रुप सेल्फी घेण्याकडेही कल मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. कापड मार्केटसह विविध ठिकाणी रंगपंचमीनिमित्त थंडाईचे स्टॉल लावण्यात आले होते. त्याचाही अनेकांनी लाभ घेतला. शहरात अनेक भागांमध्ये संध्याकाळपर्यंत रंगपंचमी खेळताना दिसून येत मुख्य रस्त्यावर दुतर्फा मांडलेल्या स्टॉलवर रंग आणि साहित्य खरेदीसाठी भर उन्हातही गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला कॉ. मलाबादे चौक ते गांधी पुतळा मार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तर शहरातील रस्ते विविध रंगात न्हाऊन गेले होते.
