शहापूरमध्ये अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या! एकच खळबळ

इचलकरंजी शहरांमध्ये खून, मारामारी, चोरी यामध्ये मोठ्या प्रमाणात खूपच वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच अलीकडच्या काळामध्ये नशिले पदार्थ राजरोसपणे इचलकरंजी शहरात मिळत आहेत आणि अल्पवयीन मुलेदेखील नशा मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यामुळेच खून, मारामारी या प्रकरणात वाढ होतानाचे चित्र आपणास पाहायला मिळत आहे.

इचलकरंजी शहरातील शहापूर मधील गावचावडी जवळ एका अल्पवयीन मुलाचा डोक्यात दगड घालून व तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर वार करून सुशांत कांबळे या अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळी शहापूर पोलिसांनी येऊन बॉडी ताब्यात घेऊन अधिक तपास सुरू केला आहे.

शहापूर परिसरात असणाऱ्या गावचावडी जवळ एका मैदानामध्ये सुशांत कांबळे राहणार आसरानगर याच्या डोक्यात दगड व पाठीवर सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळताच शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी पाहणी करून तपासाची चक्री हलवली आहेत व उर्वरित मयत डीएम करण्यासाठी इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये बॉडी आणण्यात आली.

याची माहिती सुशांत कांबळे यांच्या आई-बहीन व भावाला कळताच त्यांनी इंदिरा गांधी रुग्णालासमोर एकच हंबरडा फोडला. सुशांत कांबळे यांचे नातेवाईक, मित्र परिवारांनी इंदिरा गांधी रुग्णालयात गर्दी केली होती. ही हत्या का केली? कशासाठी केली? याचा मात्र तपास लागू शकला नाही. सध्या अल्पवयीन मुलांमध्ये गांजाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. पोलिसांनी असे नशीले पदार्थ मिळत आहेत त्या ठिकाणी कारवाई करण्याची मागणी सध्या पालक वर्गातून होऊ लागली आहे.

तसेच पालकांनी आपल्या पाल्यांना अशा नशील्या पदार्थांपासून लांब ठेवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सुशांत कांबळे याची निर्घृण हत्या केल्याचे शहरांमध्ये कळताच एकच खळबळ उडाली होती.

सुशांत कांबळे रात्री आसरानगर परिसरातून आपल्या घरी जेवण करून मित्राला भेटून येतो असे सांगून गेला होता तो परत आलाच नाही. सुशांत आपल्या मित्रांबरोबरच फिरायचा. त्याला नशा करून मारल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आता पोलीस या वाढत्या गुन्हेगारीला आळा कसा घालणार असा सवाल सध्या सर्वसामान्य नागरिक करत आहेत. या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.