इचलकरंजी मध्ये शिवीगाळ करून मारहाण ; सहाजणांवर गुन्हा दाखल

मद्य देण्यास नकार देत एकास शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द ट्रॅव्हल्स इन मधील सुहास लाटणे, गोविंद लाटणे, चिंतामणी लाटणे,ऋषीकेश लाटणे, पुष्कराज लाटणे, अभिमन्यू लाटणे यांचा समावेश आहे. या प्रकरणी निलेश सुदेश मलके याने फिर्याद दिली आहे. 

निलेश मलके व त्याच्यासोबत काहीजण द ट्रॅव्हल्स इन या बिअर बार व हॉटेलमध्ये मद्यप्राशन करत बसले होते. रात्री ११.३० वाजता निलेश याने पुन्हा बिअर मागितली. त्यावर मॅनेजरने नकार देत सुहास लाटणे यांना बोलावून घेतले. सुहास लाटणे यांनी हॉटेलमध्ये येत निलेशला शिवीगाळ सुरु केली. तसेच अन्यजणांनीही लाथाबुक्क्यांनी व प्लास्टिकच्या पाईपने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान हॉटेल मॅनेजर अनिकेत पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार निलेश मलके याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.