इचलकरंजी येथे दिवसेंदिवस खुनाच्या प्रकारात खूपच वाढ होत आहे. नुकताच एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली या खुनाचा अगदी चोवीस तासात पोलिसांनी छडा लावलेला आहे. शांतीनगर परिसरातील स्मशानभूमीत झाल ेल्या परशुराम उर्फ प्रशांत भैरु कुराडे ( वय २४ रा. इंदिरानगर) पटवली होती. परंतु हा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला याचा उलगडा झाला नव्हता. त्यामुळे आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान होते.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला आहे. या प्रकरणी अजय उर्फ नवनाथ बापू काशिद (वय २४ रा. नमाजगे माळ), आदम उर्फ संभा महंमद मुजावर (वय २० रा. नेहरुनगर) या दोघांना जयसिंगपूर येथून अटक केली आहे. तर तिसरा साथीदार साहिल चव्हाण हा अद्याप फरारी आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शांतीनगर परिसरातील कोल्हाटी डोंबारी समाजाच्या स्मशानभूमीत एका युवकाचा दगड आणि सिमेंटच्या तुकड्याने डोक्यात मारहाण करुन निर्घृणपणे खून करुन मृतदेह टाकून देण्यात आला होता. या प्रकरणाचा गतीने तपास करत गावभाग पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली होती.
गांभीर्य ओळखून पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरिक्षक रविंद्र कळमकर यांनी दोन पथके तयार करुन आरोपींचा शोध सुरु केला होता. प्राप्त माहिती, परिसरातील सीसीटिव्ही फुटेज व गोपनीय माहितीद्वारे शोध घेता हा गुन्हा पोलिस रेकॉर्डवरील अजय काशिद व आदम उर्फ संभा मुजावर यांनी केल्याचे खात्रीलायक समजले.
सदरचे आरोपी जयसिंगपूर बसस्थानक परिसरात वावरत असून ते बाहेर जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती महेश खोत व आयुब गडकरी यांना मिळाली. त्या अनुषंगाने जयसिंगपूर बसस्थानक परिसरात शोध घेता अजय उर्फ नवनाथ काशिद व आदम उर्फ संभा मुजावर हे मिळून आले. त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता साहिल चव्हाण याच्या मदतीने कुराडे याचा खून केल्याची कबुली दिली. साहिल चव्हाण याचा शोध घेतला जात आहे.