आता मुलाच्या नावापुढे लागणार आईचे नाव…नंतर वडिलांचे, चौथ्या महिला धोरणाला मंजुरी!

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या नेतृत्वाखाली चौथे महिला धोरण (Fourth Women Policy) आणले आहे, ज्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. फार बारकाईने हे धोरण आणले गेले आहे. याआधी मुल जन्माला आल्यानंतर त्याच्या नावापुढे वडिलांचे नाव लावले जायचे.

मुलाचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जायचे. आता आपण नवीन निर्णय घेतला आहे. इथून पुढे मुलाचे किंवा मुलीचे नाव, मग आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.