मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास व सुशिक्षित बेरोजगार युवकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य करत आहे.
मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना महामंडळाच्या व बँकेकडून येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी १५ मे रोजी सकाळी १० वाजता पंढरपूर येथील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ उपकेंद्र कार्यालय, गाळा नंबर ७, इंदिरा गांधी चौक शॉपिंग सेंटर, पहिला मजला याठिकाणी जनता दरबार आयोजिला आहे. पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला व माळशिरस तालुक्यातील लाभार्थ्यांना महामंडळाच्या योजनेसंदर्भात येणाऱ्या अडचणीची सोडवणूक करून घेण्याकरिता जनता दरबार उपयुक्त ठरणार आहे.
