प्रसिध्द न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मनीषा माने मुसळे यांच्या खात्यातील रकमेची सखोल चौकशी करायची असल्याचे सांगत पोलीसांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली. त्यावर न्यायालयाने मनीषा यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
वेगळे कारण असतानाही आर्थिक गैरव्यवहारातून आत्महत्या केल्याचा नवा जावईशोध पोलिसांनी लावल्याचे मनीषा यांचे वकील प्रशांत नवगिरे यांनी न्यायालयात सांगितले. शेकडो कोटींचे मालक असलेले डॉ. शिरीष अशा किरकोळ रकमेमुळे आत्महत्या करतील, हे कोणालाच पटणारे नाही, असाही युक्तिवाद केला. जामीन अर्जास अडचण यावी म्हणून पोलीसांनी नवा मुद्दा उपस्थित केल्याचेही अॅड. नवगिरे म्हणाले. परंतू, गुन्हा हाय प्रोफाईल असल्याने न्यायालयाने मनीषा यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.
