विटा येथील लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श माध्यमिक विद्यामंदिर विटा भवानीनगर या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा यावर्षीचा निकालही शंभर टक्के लागला असून कोल्हापूर बोर्डामध्ये एकमेव असे विद्यालय आहे की ज्याचा सलग २४ वर्ष १०० टक्के निकाल लागत आहे.
यावर्षी बोर्ड परीक्षेसाठी विद्यालयातून ५३ विद्यार्थी बसले होते त्यापैकी सात विद्यार्थ्यांना ९० पेक्षा जास्त गुण मिळाले असून विशेष प्राविण्यामध्ये एकूण ३७ विद्यार्थी असून प्रथम श्रेणीमध्ये १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातील प्रथम पाच क्रमांक पुढील प्रमाणे- श्रद्धा संभाजी जाधव (९५ टक्के), आर्यन विजय जाधव (९३.६० टक्के), प्रणाली हणमंत सुळे (९२.४० टक्के), स्नेहा जगन्नाथ चेकळे (९२ टक्के), गौरी सुदाम गडदरे (९२ टक्के), विराज विजय जाधव (९१.८० टक्के) असे यश मिळवले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी आम. सदाशिवराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील, संस्थेचे कार्यकारी संचालक पी.टी. पाटील, मुख्याध्यापक सुभाष धनवडे यांनी अभिनंदन केले.