तरुणांच्या सतर्कतेमुळे मिळाले ११ वासरांना जीवदान! दोघांना अटक

कत्तलखान्याकडे नेण्यात येणाऱ्या तब्बल ११ वासरांना नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. (Sangli) सांगलीच्या वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी येथे तोंड बांधलेली वासरे व वाहतूक करणारी २ वाहने पोलिसांनी ( Police) ताब्यात घेतली आहेत.अमोल व संतोष भास्कर शिंदे या दोघा तरुणांना अटक केली आहे.

सांगलीच्या वडगाव येथे कत्तलखान्याकडे नेण्यासाठी काही वासरांना एकत्रितपणे करून ही सर्व वासरे मसुचीवाडी येथे शेडमध्ये कोंडून ठेवण्यात आली होती. वासरे शेडमध्ये असल्याची माहिती तरुणांना मिळाली होती.

तरुणांनी इस्लामपूर पोलिसांना याप्रकरणाची माहिती दिली. काही तरुणांनी पोलिसांच्या समक्ष मसुचीवाडी गावाकडे धाव घेतली. तेव्हा गाईची वासरे व म्हशीच्या पिल्ले तोंड बांधलेल्या अवस्थेत मिळून आली.

पोलीस व काही तरुण रात्रीच्या वेळी अचानक आल्याने भांबावून गेलेल्या शिंदे यांच्या घरातील महिलांनी वासरे आम्ही पाळण्यासाठी आणली आहेत असे सांगितले. पोलिसांनी उलट तपासणी केल्यावर वासरांना तोंडाला बांधून कत्तलखान्यात नेण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी पोलिसांनी सर्व वासरे व वाहतुकीची बोलेरो व छोटा हत्ती जप्त करण्यात आली आहेत. मध्यरात्री सर्व वासरे पोलीस ठाण्यात आणून गो-शाळेत पाठवण्यात आली.