महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत राज्याचा गाडा हाकला जाणाऱ्या विधान भवन परिसरात आज अचानक धुळीचं साम्राज्य बघायला मिळालं. विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आज दुपारच्या वेळी अचानक सर्वत्र धूर बघायला मिळाला. यामुळे सर्वांना विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागली असं वाटलं. पण ही आग लागली नसल्याची माहिती नंतर समोर आली. दरम्यान, परिसरात प्रचंड धुराचं साम्राज्य बघायला मिळालं. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
संबंधित घटनेनंतर तातडीने प्रशासन अलर्ट झालं. हा परिसर अतिमहत्त्वाचा आणि संवेदनशील असा परिसर आहे. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर इथे सर्व काळजी घेतली जाते. असं असतानाही आज विधान भवन परिसरात अशाप्रकारचं धुराचं साम्राज्य निर्माण झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं. नेमकं काय घडलं? याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.