पुणे विभागात कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत विटा पालिका तिसरी

विटा , महाराष्ट्र शासनाच्या विभागातर्फे राबवण्यात आलेल्या १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमे अंतर्गत, पुणे विभागातील तालुकास्तरीय शासकीय कार्यलयांच्या कामगिरीचे नुकतेच मूल्यमापन करण्यात आले . या मूल्यमापनात सांगली जिल्ह्यातील विटा पालिकेने विभागात तृतीय क्रमांक पटकावून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे . या कामगिरीमुळे विटा पालिकेचा पुणे विभागातील एक आदर्श कार्यालय ,म्हणून गौरव करण्यात आला आहे .

ही विशेष मोहीम कार्यक्षम , पारदर्शक आणि जनहितकारी प्रशासन सक्षम करण्याच्या उद्धेशाने राबवण्यात अली होती. यामध्ये नागरी सेवा वितरणाची गती दैनंदिन कार्य पद्धतीतील सुधारणा तांत्रिक प्रणाली चा वापर नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही तसेच कार्यालयीन शिस्त सारख्या विविध महत्वाच्या घटकाचा समावेश होता . या सर्वच निकषांवर विटा पालिकेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे . या यशात जिल्ह्धिकारी अशोक काकडे , जिल्हा सहआयुक्त चंद्रकांत खोसे , विटा पालिकेचे प्रशासक विक्रमसिंह बांधलं , मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील आणि उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर तसेच पालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे योगदान आहे . या यशाने विटा पालिकेचा विशेष सत्कार राज्य शासनाकडून करण्यात येणार आहे.