सांगोला, अज्ञात चोरट्याने घराचा कडी कोयंडा या कुलूप तोडून कपाटातील ४ तोळ्यांचे दागिने या रोख रक्कम असा २ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सांगोला तालुक्यातील कराडवाडी कोले येथे घडली आहे . याप्रकरणी महेश रामचंद्र इमडे यांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी महेश रामचंद्र इमडे (राहणार कराडवाडी, कोले, ता. सांगोला ) हे १७ मे रोजी रात्री अकरा च्या सुमारास जेवणखाण करून कपाट असलेल्या रूम ला कुलूप लावून बाजूच्या रूम मध्ये झोपी गेले होते. तर त्यांचे आईवडील हे घरच्या वर छतावरून खाली आले असता त्यांना कुलूप लावलेल्या रूम च्या दरवाज्याचा कडी कोंडा व कुलूप तोडलेले दिसले. तसेच फिर्यादी झोपलेल्या रूम ला बाहेरून कडी लावलेली दिसली त्यावेळी त्यांनी आरडाओरड करू लागले फिर्यादीच्या रूम ची कडी काढल्यानंतर सर्वानी कुलूप तोडलेल्या रूम मध्ये जाऊन पहिले असता रूम मधील कपाटाचे दरवाजे उघडे दिसले . व कपाटातील साहित्य अस्ताव्यस्थ पडलेले दिसले.
अज्ञात चोरटयांनी बंद घराचा कडी कोयंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश करून कापटतील ५० हजार रुपये किमतीचा १ तोळ्याचा सोन्याचा नेकलेस , ५० हजार रुपये किमतीची १ तोळ्याची सोन्याची सर , ५० हजार रुपये किमतीचे १ तोळ्याचे सोन्याचे झूबे फुले , ४५ हजार रुपये किमतीच्या ३ ग्राम वजनाच्या ३ अंगठ्या , १० हजार रुपये किमतीचे २ ग्राम वजनाचे सोन्याचे बदाम , ४५ हजार रुपये रोख रक्कम असा २ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे याप्रकरणी
महेश रामचंद्र इमडे यांनी अज्ञात चोरट्या विरुद्व सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.