गेल्या अनेक दिवसांपासून सांगोला तालुक्यात दर रविवारी आठवडा बाजारात मोबाईल चोरीच्या घटना घडत आहेत गेल्या आठवडा बाजारात अनेक मोबाईल चोरट्यांनी हातोहात मोबाईल लंपास केले आहेत, मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना एखादा अपवाद वगळता सपशेल अपयश आले असल्याचे दिसून येत आहे, गर्दीचा फायदा घेत रविवारी आठवडा बाजारातून मोबाईल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढल्याने चोरट्यांनी आठवडा बाजारात घातलेला हा धुमाकूळ पाहता शहरवासीय नागरिक, व्यापारी चांगलेच हैराण झाले आहेत तर अचानक पणे मोबाईल चोरीला गेल्याने अनेकदा बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे शहर बीटच्या कार्यपद्धतीवरती सर्वसामान्य शहरवासीयातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे.
