खानापुरातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेला उरूस उत्साहात साजरा

अनेक भागातील अनेक यात्रा मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात. अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन यात्रेनिमित्त करण्यात येते. पण खानापूर येथील उरूस खूपच आदर्शनीय आहे. खानापूर येथील उरूस हा हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक आहे. खानापूर येथील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेला हजरत माँसाहेब उरूस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाप्रसादाचा अनेक भाविकांनी लाभ घेतला. दि. १२ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या उरुसाच्या कालावधीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उरुसाला खानापूर परिसरातील हिंदू-मुस्लीम भाविक, मानकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.