मलेशिया मास्टर्सच्या अंतिम सामन्यात किदाम्बी श्रीकांत च्या वाट्याला निराशा !

रविवारी झालेल्या मलेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत चीनच्या जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या ली शी फेंगकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागल्याने भारतीय खेळाडू किदाम्बी श्रीकांतला (Kidambi Srikanth) त्याचा दीर्घकाळचा जेतेपदाचा दुष्काळ संपवता आला नाही. दुखापती आणि हुकलेल्या संधींमधून पुनरागमन करताना, श्रीकांतने सहा वर्षांत प्रथमच बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्समध्ये प्रवेश केला. पात्रता फेरीतून सुरुवात करून अंतिम फेरीत पोहोचलेल्या या भारतीय खेळाडूला दुसऱ्या मानांकित शि फेंगकडून ३६ मिनिटांत ११-२१, ९-२१ असा पराभव पत्करावा लागला आणि त्याची प्रभावी मोहीम संपुष्टात आली. त्याला शी फेंगच्या मजबूत बचावात भेदण्यात अडचण आली आणि सुरुवातीच्या संधींचे यशात रूपांतर करण्यात तो अपयशी ठरला.

सामन्यानंतर श्रीकांत म्हणाला, हा आठवडा खूप चांगला गेला. या हंगामातील ही माझी तिसरी स्पर्धा आहे, मी पहिल्या दोन स्पर्धांमध्येही चांगली कामगिरी केली पण मला त्यात फारसे यश मिळाले नाही. मी आतापर्यंत ज्या पद्धतीने खेळत आहे त्यावर खूप आनंदी आहे. आज मला ज्या पद्धतीने खेळायचे होते ते मला जमले नाही, पण शी फेंग खरोखरच चांगला खेळला आहे. त्यामुळे पुन्हा व्यासपीठावर येणे खरोखरच खास वाटते. या पराभवानंतरही, त्याने संपूर्ण स्पर्धेत त्याच्या कामगिरीने प्रभावित केले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला तो जागतिक क्रमवारीत ८२व्या स्थानावर घसरला होता. त्याच्या हुशार कौशल्याने त्याने जगाला त्याच्या क्षमतेची जाणीव करून दिली आहे. श्रीकांतने शेवटचा २०१९ मध्ये बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरमध्ये इंडिया ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तेव्हाही तो उपविजेता होता. तो २०२१ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही रौप्यपदक विजेता ठरला होता. येत्या काळात त्याला आणखी चांगली कामगिरी करावी लागेल.

श्रीकांतने सुरुवातीला चुका केल्या ज्यामुळे त्याचे गुण गमवावे लागले आणि शि फेंगने ६-३ अशी आघाडी घेतली. भारतीय खेळाडूने बैंकहँडवर सरळ स्मॅश मारल्याने त्याच्या प्रतिस्पर्ध्याला ८-५ अशी आघाडी मिळाली. श्रीकांतने नेटवर केलेल्या स्मॅशमुळे ब्रेकपर्यंत विनी खेळाडूला पाच गुणांची आघाडी मिळाली. साच्या चुका श्रीकांतला महागात पडल्या. त्याचे दोन लूज शॉट लांब गेले आणि ली फेंगने अचूक क्रॉसकोर्ट विनरसह प्रत्युत्तर देत स्कोअर १४-८ केला. श्रीकांत १०-१६ ने पिछाडीवर होता. ली फेंगने सलग डाउन-द-लाइन’ स्मॅशसह १६ मिनिटांत सुरुवातीचा गेम संपवला. तथापि, श्रीकांतने दुसऱ्या गेममध्ये चांगली कामगिरी केली. परंतु कडक रॅली असूनही, त्याचे स्ट्रोक अनेकदा वाइड जात होते, ज्यामुळे ब्रेकपर्यंत ली फेंगला ११-५ अशी आघाडी घेता आली.