इस्लामपूर ,तब्बल ३९ वर्षे निर्वाह भत्त्यापासून वंचित सांगली जिल्ह्यातील ३५० वारणा धरणग्रस्त खातेदारांना राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्यावतीने प्रत्येकी रुपये १ लाख ८५ हजार निर्वाहभत्ता निधी मंजूर झाला आहे . माजी जलसंपदामंत्री आ . जयंत पाटील यांनी पाठपुरवठा केल्याने हा निधी मंजूर झाला आहे .
कार्यकर्ते राम सावंत म्हणाले , ज्यांच्या जमिनी वारणा धरणात गेल्या आहेत , त्या खातेदारांना महिन्याला रुपये ४०० प्रमाणे निर्वाहभत्ता मिळायला हवा होता . मात्र १९ वसाहतीमधील ३५० खातेदार तब्बल ३९ वर्षे निर्वाह भत्त्यापासून वंचित होते . जिल्ह्यातील वाळवा , शिराळा व मिरज तालुक्यातील ३५० खातेदारांना सध्या निर्वाह भत्त्याचे वाटप सुरू आहे.
याप्रसंगी दिलीप पाटील ,मारुती रेवले,किरण पाटील ,मुबारक कावनकर,महादेव पाटील ,शंकर लोखंडे ,तानाजी पाटील बोरगाव ,रामचंद्र सोनावणे ,धरणग्रस्त उपस्थित होते.
