इस्लामपूर येथे जैन श्वेतांबर संघाचा उपक्रम कौतुकास्पद – राहुल मर्ढेकर

इस्लामपूर येथील जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाच्या वतीने नगरपालिकेच्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोफत टिफीन वाटप हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. दुर्लक्षित घटकाची घेतलेली दखल ही कौतुकास्पद बाब आहे. संघाने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे, असे मत इस्लामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांनी व्यक्त केले. इस्लामपूर येथे प. पू. पंन्यास श्री.जयभानूशेखर विजयजी म.सा व प.पू. साध्वीजी पुण्यनिधी श्रीजी म.सा. यांच्या दीक्षा दिवसाचे औचित्य साधून श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाच्या वतीने आयोजित नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांना जीवनोपयोगी मोफत साहित्य वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दोनशे स्वच्छता कर्मचाऱ्यांना टिफीनचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी विश्वस्त राजकुमार ओसवाल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भगवानराव खाडे, आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळुंखे, उपाध्यक्ष अमित शहा, किशोर रायगांधी, जितूभाई शहा, हितेश कटारिया, भरत पोरवाल, उमेश रायगांधी, राधेय शहा, अभय शहा, अरुण शहा, महावीर पारेख, संयम कोठारी, नमन शहा, सचिन दोशी, दिलीप शहा यांसह जैन समाजातील श्रावक, श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्वागत व प्रास्ताविक गौतम रायगांधी यांनी केले. आभार विश्वस्त भूषण शहा यांनी मानले.