दमदार पावसाने आटपाडी शहरातील उपनगरे आणि अनेक चौकात पाणी साठले आहे. रस्त्यांची तर अक्षरशः दुर्दशा झाली आहे ड्रेनेज व्यवस्था कोलमडली आहे. नागरिकांचे हाल सुरु आहेत . शहरात मध्यवर्ती ड्रेनेज सिस्टिमच नाही. साई मंदिर चौकात रस्त्याचे काम सुरु असून पाणी साचले आहे. बसस्थानक , बाजार पटांगण परिसरात चिखल झाला आहे. साठेनगर ते बाजारपटांगण या वर्दळीच्या रस्त्याच्या तर चिंध्या झाल्या आहेत . थिएटर चौक ते बाजारपटांगण रस्त्यावर दुचाकी चालवणे मुश्किल झाले.
आटपाडी : ड्रेनेज व्यवस्था कोलमडली
