आष्ट्यात अपघातात एक ठार, एक जखमी 

आष्टा इस्लामपूर रोडवर रस्त्याचे काम करणाऱ्या जेसीबीने  धडक दिल्याने मोटरसायकल वरील भाऊ ठार, तर बहिण जखमी झाली. प्रथमेश समीर लाड (वय २३, रा. आष्टा) असे अपघातातील मयताचे नाव तर पद्मश्री सुनील पाटील (वय २६, रा. बाचळवाडी ता. पन्हाळा) असे अपघातातील जखमी महिलेचे नाव आहे. गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास आष्टा इस्लामपूर रोडवर, आष्टा लायनर्स समोर हा अपघात झाला. याप्रकरणी राजेश लाड यांनी फिर्याद दिली. त्यानुसार जेसीबी चालक अनिल सत्यम सिंग (रा. इस्लामपूर) याच्यावर आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.