जादा परताव्याचे आमिष; ४५ लाखांची फसवणूक

आष्टा, दिवसा १० ते १५ टक्के परतावा देतो असे भासवून हरिश्चंद्र रामचंद्र इंगळे (वय ५० रा. दत्त वसाहत आष्टा) यांची विजय सिंघ या इसमाने व शेअर मार्केट संबंधित तीन व्हाट्सएप ग्रुप तयार करणाऱ्या ग्रुप ऍडमिन तसेच मेसेज पाठवणाऱ्या आरोपींकडून ४५ लाखांची ऑनलाइन फसवणूक केली असल्याचा प्रकार नुकताच. 

याबाबत हरिश्चंद्र इंगळे यांनी  विजय सिंघ सह के- २१ अलायन्स ट्रेनिंग टीम ए चा ग्रुप ऍडमिन व एक मोबाईल नंबर धारक, के- २१ विजय सिंघ स्ट्रॅटेजीक इन्व्हेस्टरचा ग्रुप ऍडमिन इतर दोन मोबाईल नंबर धारक, फियेरा कॅपिटनेल्स शेअर मार्केट नावाच्या व्हाट्सएप ग्रुप वरून मेसेज पाठवणारे इसम यांच्या विरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २२ एप्रिल २०२५ ते १३ मे २०२५ या कालावधीत आरोपी विजय सिंघ व संबंधित ग्रुप अॅडमिन व मेसेज पाठवणारे इसम यांनी फिर्यादी हरिश्चंद्र इंगळे यांना दिवसाला १० ते १५ टक्के परतावा देतो असे भासवून फियेरा कॅपिटल नावाच्या अॅप्लिकेशनवर फिर्यादी हरिश्चंद्र इंगळे यांचे शेअर मार्केट अकाउंट उघडल्याचे भासवून ४५ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत.