दारु पिऊन वाहन चालविणान्यास १० हजाराचा दंड

इचलकरंजी, दारु पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी दोषी राहुल राजेंद्र माळी (वय ३०, रा. इचलकरंजी) याला येथील न्यायालयाने १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याबाबत मिळालेली माहिती अशी, ९ मे २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास राहुल माळी हा आपल्या मोटारसायकलवरून जात होता. परंतु तो वाकडे तिकडे रस्त्याची परिस्थिती न पाहता वाहन चालवताना शिवतीर्थ परिसरात सहायक फौजदार मारुती पाटील यांना मिळून आला. माळी हा दारू पिऊन वाहन चालवत असल्याचा संशय आल्याने त्याची ब्रेथ अनोलायझर मशीन मफत तपासणी केली असता माळी याने अल्कोहोलचे सेवन केल्याचे दिसून आले. त्याला ताब्यात घेऊन पाटील यांनी फिर्याद दाखल केली. या प्रकरणी येथील फौजदारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी होऊन माळी याने दारू पिऊन वाहन चालवल्याचे सिध्द झाल्याने न्यायालयाने माळी यास १० हजार रुपये दंड ठोठावला. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी काम पाहिले.