महिम ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच अर्चना सुरेश नारनवर यांच्याविरोधात १५ पैकी १३ सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव गुरुवारी , २९ मे रोजी ‘अखेर’ १३ विरुद्ध २ मताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे नवीन सरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला. असून सरपंच पदासाठी शेकाप कडून सचिन गजेंद्र नारनवर यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे.
महिम ग्रामपंचायतीच्या १५ सदस्यांपैकी १३ सदस्यांनी सरपंच अर्चना नारनवर यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत मनमानी कारभार, अपारदर्शक निर्णय प्रकिया आणि ग्रामपंचायतीच्या ठरावांची अंमलबाजवणी न करणे आदी कारणावरून ग्रा. पं . सदस्य वसंत ईश्वरा रूपनर यांचेसह इतर ११ ग्रामपंचायत सदस्य , सदस्यांनी सरपंच अर्चना नारनवर यांच्याविरुद्ध २३ मे रोजी तहसीलदार सांगोला यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. गुरुवार, २९ मे रोजी दुपारी २ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार संतोष कणसे यांच्या अध्यक्षेतेखाली अविश्वास ठरावावर विशेष सभेचे आयोजन केले होते एकूण १३ ग्रा. पं . सदस्यांनी हातावर करून अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले तर सरपंच अर्चना नरनावर आणि उपसरपंच नानासाहेब बंडगर यांनी अविश्वास ठरावाला विरोध दर्शविला . याप्रसंगी मंडलाधिकारी प्रशांत जाधव , ग्रामविकास अधिकारी खानसाहेब मुलाणी , बाळासाहेब कोळी उपस्थित होते.
