एमपीएससी परीक्षा नियमांचे उल्लंघन केल्यास उमेदवारी रद्द होणार !

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. परीक्षा १ जून, २०२५ रोजी होणार आहे. या परीक्षेसंदर्भात आयोगाने काही नियम आणि सूचना जारी केल्या आहेत. परीक्षा केंद्रावर प्रवेश घेण्यासाठी नियम, ओळखपत्र आणि इतर आवश्यक गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न केल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते.

‘एमपीएससी’ने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ साठी सूचना जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळवण्यासाठी काही गोष्टी अनिवार्य आहेत. आयोगाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड केलेले प्रवेशपत्र सोबत असणे आवश्यक आहे. परीक्षेत उपस्थित राहण्यापूर्वी, आयोगाच्या संकेतस्थळावरील Guidelines for Examination काळजीपूर्वक वाचा, असे MPSC ने सांगितले आहे.

परीक्षा कक्षात मोबाईल फोन किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात मित्र, नातेवाईक किंवा इतर अनधिकृत व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. जर कोणी विद्यार्थी परीक्षा वेळी मद्यपान करून किंवा मादक पदार्थांचे सेवन करून आढळल्यास, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. पडताळणी आणि तपासणी झाल्यानंतर, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या नेमून दिलेल्या जागेवर बसणे अनिवार्य आहे. अन्यथा, आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे मानले जाईल. परीक्षा केंद्रावर पार्किंगची व्यवस्था नसेल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या वाहनांची सोय स्वतःच करावी.