सध्या दहावी बारावी परीक्षांमध्ये सर्व पालक तसेच विध्यार्थी व्यस्त आहेत. सगळ्यांचे लक्ष अभ्यासाकडे लागले आहे. अनेक विध्यार्थी अभ्यास न झाल्याने टेन्शन मध्ये असतात. दरम्यान दहावी बोर्डाच्या परीक्षा तणावातून १६ वर्षीय मुलीने, घराच्या पत्र्याशेडमध्ये लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेतला असल्याची घटना घडली आहे.
दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनगर ता. सांगोला येथे घडली आहे.
याप्रकरणी साधना नाथा साठे रा. बेंद वस्ती अचकदाणी ता. सांगोला यांनी पोलीसात खबर दिली असून ऋतुजा युवराज बाबर (वय १६) रा. लक्ष्मीनगर ता. सांगोला असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.