आटपाडी ; लेंगरेवाडी ता. आटपाडी येथे शेतीच्या वादातून लक्ष्मण कोंडीबा ढेरे (वय ७४) यांना गावातील चार व्यक्तींनी मारहाण केली. याबाबत लक्ष्मण ढेरे यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हंटले आहे कि,ते त्यांच्या लेंगरेवाडी येथील घरासमोर थांबले असताना , संशयित आरोपी अशोक विठोबा ढेरे व दत्ता विठोबा ढेरे हे घराची आखणी करत होते. यावेळी त्यांनी आधी माझे शेत वाटून द्या,नंतर घर बांधा असे सांगितल्याने वाद वाढला. रागातून अशोक आणि दत्ताने शिवीगाळ केली . लाकडी फळीने खांद्यावर व डाव्या हाताच्या पंजावर मारहाण केल्याने ते जखमी झाले. दरम्यान, संतोष आणि गुत्ता विठोबा ढेरे यांनी देखील शिवीगाळ करून वातावरण अधिक चिघळले. या प्रकरणी पोलिसांनी चौंघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.