सरकारी (Government)संरक्षण कंपनी कोचीन शिपयार्ड लिमिटेड च्या शेअर्सने सलग तिसऱ्या दिवशी मोठी उसळी घेतली आहे. बीएसईवर शुक्रवारी शेअर ८.३८ टक्क्यांनी वाढून २५४७.२५ रुपयांवर पोहोचला. फक्त ३ कामकाजाच्या दिवसात या शेअर्सने गुंतवणूकदारांना ३२ टक्के परतावा दिला आहे.
शेअर बाजारात या कंपनीची कामगिरी खूप चांगली राहिली आहे. २०२५ मध्ये कोचीन शिपयार्डच्या शेअर्समध्ये ५५ टक्के वाढ झाली आहे. तसेच हा शेअर एका वर्षात ३१ टक्के परतावा देण्यात यशस्वी झाला आहे. या काळात सेन्सेक्स ४.७२ टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या ५ वर्षात या संरक्षण शेअर्सच्या किमतीत १९०५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ब्रोकरेज हाऊस वेल्थमिल्स सिक्युरिटीजचे संचालक म्हणतात, कोचीन शिपयार्ड सारख्या संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये अलीकडेच वाढ झाली आहे. हा शेअर दीर्घकाळात मजबूत दिसतो. गुंतवणूकदार घसरणीवर गुंतवणूक करू शकतात. त्याच वेळी दुसऱ्या एका तज्ज्ञांचे मत आहे की कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण शेअर्समध्ये अलिकडच्या काळात प्रचंड वाढ दिसून आली आहे. गेल्या एका महिन्यात कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कोचीन शिपयार्डमध्ये सरकारचा एकूण हिस्सा ६७.९१ टक्के आहे. या कंपनीचे शेअर्स २०२४ मध्ये विभागले गेले आहेत. त्यानंतर कंपनीचे शेअर्स १० भागांमध्ये विभागले गेले. त्यानंतर शेअर्सचे दर्शनी मूल्य प्रति शेअर १ रुपये इतके कमी झाले.
