गाईला वाचवताना कचकाटून ब्रेक दाबला; भीषण अपघात

रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावर एर्टिगा कार आणि एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले असून 4 प्रवासी जखमी आहेत.गाईला वाचवताना एर्टिगा कार चालकाने ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या एसटी बसची कारला जोरदार धडक बसली. दोन्ही गाड्यांचा वेग अधिक असल्याने जोरदार टक्कर झाली.या अपघातात 4 जण जखमी झाल्याची माहिती असून जखमींना कोलाडमधील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलंय.अपघातात एर्टिगा कारचे मोठे नुकसान झाले असून पाठीमागील काच चक्काचूर झाली आहे. अपघातानंतर स्थानिकांनी व इतर प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेतली.मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड जवळच्या पुगाव गावाजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर एसटी बस रस्ता सोडून डिव्हायडरवर गेल्याचं पाहायला मिळत आहे.दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे. सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. अपघातात नुकसान झालेली कार एम एच. 02 म्हणजेच मुंबईची असल्याचे दिसून येते. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान, स्थानिकांनी व इतर प्रवाशांनी मदत केल्याने अपघातात जखमी झालेल्या कार व बसमधील प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.