अनिलभाऊंच्या वाढदिवसाची विट्यात जय्यत तयारी! शेकडो शेतकरी एकत्र

आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस जोरदार करण्यासाठी जय्यत तयारीसाठी शेकडो शेतकरी एकत्र आलेले आहेत. आमदार अनिल भाऊंचा वाढदिवस जंगी स्वरूपात करण्याची घोषणा या शेतकऱ्यांनी केली आहे.

सेना भवनात बैठक घेऊन अनिल भाऊ प्रेमींनी वाढदिवशी घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली आहे. अनिल भाऊंच्या वाढदिवसानिमित्त पाच ते नऊ जानेवारी दरम्यान विट्यामध्ये जोरदार यंत्रणा लावण्यात येणार आहे. या काळात भव्य दिव्य असे बळीराजा कृषी व पशुपक्षी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

मायणी रस्त्यावरील पंचफुला मंगल कार्यालयासमोरील पटांगणात हे कृषी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. तसेच अनेक डॉग शो देखील घेण्यात येणार आहे. तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन देखील सात तारखेला घेण्यात येणार आहे. नऊ तारखेला या प्रदर्शनाची सांगता समारोह होणार आहे.