सोनिया वहिनींची जोरदार यंत्रणा, प्रचारात आघाडी….

महायुतीचे उमेदवार सुहासभैया बाबर यांच्या प्रचारार्थ विट्यात जोरदार यंत्रणा उभी करण्यात आली आहे. त्यानुसार सोनिया वहिनी बाबर यांच्यासह कार्यकर्त्यांनी उपनगरात जोरदार प्रचार सुरू केला आहे. शिवसेना शहर प्रमुख सुधीर उर्फ राजू भैया जाधव, अमोल मंडले, प्रकाश सपकाळ, प्रशांत पाटील, हसन मुल्ला, बाबासाहेब चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हनुमतनगर परिसरात घरोघरी जाऊन सोनिया वहिनींनी गाठीभेटी घेतल्या आहेत.

यावेळी सोनिया वहिनी बाबर यांच्यासोबत प्रचारासाठी परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी कुटुंबीयांना भरभरून आशीर्वाद द्या अशी विनंती करत सोनिया वहिनी बाबर यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले.