सांगली, मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून रुग्णांना जास्तीत जास्त रुग्णांना केलेल्या मदत कार्याची दखल घेत विट्यातील गौरव गुळवणी यांचा शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते कोल्हापूर येथे विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी नामदार राजेश क्षीरसागर, कक्ष प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित मेळावा कोल्हापूर येथे पार पडला. या मेळाव्यात रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी मधून आर्थिक मदत मिळवून देणे, रुग्णांना बिलात सवलत मिळवून देणे, रुग्णांना सर्व योजनांचा लाभ मिळवून देणे, तसेच रुग्णांना विविध ट्रस्ट कडून निधी उपलब्ध करून देणे, अशा समाजकार्याच्या माध्यमातून केलेल्या कामाची दखल घेऊन गौरव गुळवणी यांचा शिवसेनेच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी गौरव गुळवणी म्हणाले, आजपर्यंत आमचे दैवत स्व. अनिल भाऊ बाबर व आ. सुहास बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात जवळपास पावणेदोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून वितरित करण्यात आला. तसेच रुग्णांचे लाखो रुपयांचे बिलात सवलत व माफ करण्यात यश आले आहे. तसेच जवळ पास १५० रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेत अंतर्गत मोफत उपचार करून देण्यात आले. आगामी काळात देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून रुग्णसेवेसाठी प्रयत्नशील राहणार आहोत अशी ग्वाही गुळवणी यांनी दिली. यावेळी आ. सुहास बाबर, माजी आम. सुजित मिंचेकर, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कार्याध्यक्ष रामहरी राऊत, युवराज काकडे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना वैद्यकीय कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
