दीपकआबा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी विलास डोंगरे

सांगोला येथील दीपकआबा साळुंखे -पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विलास डोंगरे यांची , तर व्हॉइस चेअरमनपदी गोविंद भोसले यांची निवड करण्यात अली आहे. याप्रसंगी मावळते चेअरमन माणिक मराठे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त करून नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

चेअरमन व व्हॉइस चेअरमन पदासाठी या दोघांचेच अर्ज आल्यामुळे अध्वासी अधिकारी अमर गोसावी यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली . निवडीनंतर दोघांचेही सर्व उपस्थितांनी अभिनंदन केले . याप्रसंगी संचालक तानाजी साळे, वसंत बंडगर , संजय गायकवाड , कमल खबाले , पल्लवी मेणकर तज्ज्ञ संचालक कैलास मडके, सचिव अमर कुलकर्णी ,प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष सुहास कुलकर्णी , तानाजी खबाले, विकास साळुंखे , तालुकाध्यक्ष मोहन आवताडे , संजय काशीद , संतोष निंबाळकर , मोहन काशीद , उमेश ,महाजन , नवनाथ साळुंखे , पंकज मसगौडे , संजय सरगर आदी उपस्थित होते.