वझरे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

सांगोला – वझरे ता.सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव घोषणा देऊन मानस पवार व तेजस पवार या बालचिमुनी सर्वांची मने जिंकली. याप्रसंगी शरण्या जाधव, देवानंद जंबगी यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सरपंच मल्हारी चव्हाण, उपसरपंच लक्ष्‍मण वाघमारे, ग्रा.पं.सदस्य बाबुराव जाधव, सचिन यादव, वसंत पाटील, महादेव पवार, अशोक पाटील, अंकुश पाटील, धोंडीराम पाटील, उत्तम जोंधळे, नितीन पाटील, सुभाष कोकरे, आनंदा कोकरे, सचिन कोकरे, बाळासो वाघमोडे, सदाशिव वाघमोडे, दत्तात्रय आलदर, महेश वाघमारे, शरद गुरव, दासू गुरव, सुरेश पवार, सुरेश रेड्डी, प्रशांत कदम, प्रशांत पाटील, दत्तात्रय वाघमारे, काका वाघमारे, नितीन वाघमारे, संभाजी शिंदे, बापू पवार, कार्तिक पवार, नरसिंह निंबाळकर, ग्रामसेविका मेघा हिप्परकर, रविराज शेटे, निलेश जाधव, पल्लवी जाधव, वर्षा पवार, आर्.एन.जाधव, शुभम कुडचे, संस्कार पवार, संजय यादवाडे, सुरेश पवार उपस्थित होते.

सूत्रसंचालन आबा पवार यांनी केले. आभार प्रा.के.वाय.पाटील यांनी मानले.