हिमाचलमध्ये पाऊस, पूर अन् हाहाकार, प्रियजन दगावल्याने काळीज चिरणारा आक्रोश

हिमाचल प्रदेशात दमदार पाऊस आणि ढगफुटीमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यांमध्ये ढगफुटीमुळे पाच जण दगावले आहेत, तर ५ जण बेपत्ता आहेत. यामुळे प्रियजनांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हवामान विभागाने २९ जूनला Orange Alert जारी केला आहे. अनेक ठिकाणी पूराचा आणि भूस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी दुर्घटनेबदद्ल सांगितले की, राज्यात तीन ठिकाणी ढगफुटी झाली असून नऊ ठिकाणी अचानक पूर आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत २५० लोकांना वाचवण्यात यश आले. मृतांपैकी चार जणांची सध्या ओळख पटली आहे.

हिमाचल (Himachal) प्रदेश कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यांमध्ये ढगफुटीमुळे मोठी दुर्घटना घडली आहे. कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे आलेल्या पुरात गाड्या वाहून गेल्या, ज्यात तीन जण बेपत्ता आहेत. या प्रलयानंतर एका व्यक्तीला जंगलातून वाचवण्यात आले. बचावलेल्या नागरिकाने सांगितले की, पूर आल्यावर तो आणि त्याचे साथीदार जंगलात पळाले होते. त्याचे आठ साथीदार पाण्यात वाहून गेले आहेत. अचानक आलेल्या पुरामुळे मनालीतील रस्ते खराब झाले आहेत.’ असे कांगडाचे पोलीस निरीक्षकांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले. तर मुख्यमंत्री सुक्खू यांनी पर्यटकांना नद्या आणि नाल्यांजवळ न जाण्याचा सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्री सुक्खू म्हणाले की, बुधवारी मझान नाला येथे जीवा ट्रेंच वेअरजवळ ढगफुटी झाली. ज्यामुळे नदीच्या पाणीपातळीत भर पडली आहे. कुल्लूमध्ये सध्या दोन जण बेपत्ता आहेत, तर कांगडामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य बेपत्ता पाच जणांचा शोध सुरू आहे.

अचानक आलेल्या पुरामुळे बाधित झालेले बहुतेक लोक धरमशाला येथील वीज प्रकल्पात काम करणारे मजूर आहेत. एनडीआरएफचे कमांडंट बलजिंदर सिंह यांनी सांगितले की, केवळ एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचू शकत आहे. आतापर्यंत केवळ एक मृतदेह बाहेर काढता आला आहे. आसपासची सुमारे १५ घरे प्रभावित झाली आहेत. तर हवामान विभागाने येत्या दिवसांत दमदार पाऊस पडणार असल्याचे सूचित केले आहे. २९ जूनला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये अनेक ठिकाणी अचानक पूर आणि भूस्खलन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.