जिल्हा परिषदेच्या शाळेत दुर्घटना, तास सुरु असतानाच स्लॅब कोसळला

राज्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत (Zilla Parishad school) एक दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे. वर्गात तासिका सुरू असतानाचा स्लॅबचे प्लास्टर कोसळले आणि यात बाकावर बसलेला विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. वाशिममधील भटउमरा गावात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ही दुर्घटना घडली.

भटउमरा गावातील जिल्हा परिषद शाळेतील वर्गात तास सुरू होता अचानक एका कोपऱ्यातील स्लॅबचा भाग कोसळला. तेथे बसलेल्या विद्यार्थ्यावर त्या भागाचे तुकडे पडले ज्यात तेथे बाकावर बसलेला विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्या विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागला. उपचारासाठी त्याला तात्काळ जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले. शिवाजी उमाळे विद्यार्थ्याचे नाव असून तो सातवी इयत्तेत शिकत आहे. या घटनेने शाळेतील विद्यार्थी भयभीत झाले आहेत. तसेच पालकांनाही पाल्याबद्दलची चिंता वाढली आहे. शाळेची इमारत दहा वर्षापूर्वीच बांधण्यात आली होती.

या दुर्घटनेनंतरचा व्हिडिओ समोर येत आहे. त्यात दिसून येते की स्लॅबच्या प्लास्टरचा मोठा भाग खाली कोसळला असून. वर्गातील बॅंचवर बॅगवर त्याचे तुकडे पडले आहेत तसेच वर्गात मोठ्या प्रमाणात सिमेंटचे तुकडे पडल्याचे दिसत आहेत.