आषाढी एकादशीनिमित्त छत्रपती संभाजीनगर विभागातून १३५ एसटी बसेस धावणार

यंदा आषाढी एकादशीनिमित्त छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) विभागातून १३५ एसटी गाड्यांचे प्रवासी वाहतूकीसाठी नियोजन करण्यात आले आहे. आगामी दोन जुलैपासून ही सुविधा सुरू होणार आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी यात्रा स्पेशल दर घोषित करण्यात आले आहे. यंदाही नवीन गाड्या नसल्याने जुन्या गाड्यातून पंढरपूरला जाणाऱ्या यात्रेकरूंना प्रवास करावा लागणार आहे.

आषाढी एकादशीसाठी अनेक जण वाऱ्यामधुन पंढरपुराच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी निघाले आहेत. आषाढी एकादशीसाठी अनेक जण छत्रपती संभाजीनगर विभागातून बसचे नियोजन करण्यात आले आहे. पंढरपूर यात्रेसाठी विशेष बस सोडण्यात आले आहे. पंढरपूर यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष मंडप टाकून, त्यांच्यासाठी विशेष सोय करण्यात येत असते. यंदाही प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. आषाढी एकादशीसाठी दोन जुलैपासून ते १३ जुलै या दरम्यान चालविण्यात येणार आहे.

आषाढी एकादशीनिमित्त चिकलठाणा, पुणे किंवा नागपूर येथे तयार होणाऱ्या नवीन गाड्या यात्रेसाठी दिल्या जात होत्या. या परंपरेत खंड पडला आहे. यंदाच्या वर्षीही नवीन गाड्या आषाढी एकादशीसाठी सोडण्यात येणार नाही. यंदाच्या वर्षी जुन्या गाड्यांमधुन पंढरपुराच्या भक्तांना प्रवास करावा लागणार आहे.

असे आहे नियोजन

छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानक आगार २ – २५ बस
छत्रपती संभाजीनगर सिडको आगार क्रमांक १ – ३० बस
पैठण – २० बस
सिल्लोड – २० बस
वैजापुर – १० बस
कन्नड – १० बस
गंगापूर – १० बस
सोयगाव – १० बस