शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! खरिपाच्या या १३ पिकांना विमाकवच लागू

खरिपाच्या १३ पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात अली. आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी २ टक्के इतका विमा (Insurance) हप्ता भरायचा आहे. या पिकांसाठी ७० टक्के इतका जोखीम स्तर निश्चित करण्यात आला. असून , पीक विमा भरण्यासाठी फार्मर आयडी , तर पीक विम्याचा लाभघेण्यासाठी पीक पाहणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आहे. पीक विमा घेण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत निश्चित करण्यात अली आहे. १ जुलैपासून प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून , शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत जवळच्या सीएसी सेंटरवर जाऊन पीक विमा भारता येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी ) क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. याशिवाय ई -पीक पाहणी बंधनकारक करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची निवड कार्यात आली आहे. फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे मृत शेतकऱ्याच्या नावे विमा भरल्यास किंवा अवैध मार्गाने पीक विमा भरल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल . बोगस विमा काढण्यात आला किंवा महसूल विभागाच्या दप्तरात फेरफार करून पीक विमा भरण्यात आला, तर अशा शेकऱ्यांवर गुन्हा दाखल त्यांना पाच वर्षांकरिता काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे.